

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: प्रहार संघटना पूर्णा शाखेच्या वतीने पूर्णा पंचायत समिती आणि तहसिल कार्यालयावर आज (दि.१) दुपारी १ वाजता दिव्यांग, विधवा, निराधारांच्या न्याय हक्कासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. Parbhani News
विनाअट दिव्यांग, विधवा, निराधार, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मंजूर करण्यात यावी, दिव्यांगांना अंत्योदय योजनेअंतर्गत तात्काळ शिधापत्रीका देण्याचा याव्यात, त्यांची पेन्शन राष्ट्रीयकृत बँकेत जमा व्हावी, अपात्र बीपीएल धारकांना बीपीएल मधून वगळण्यात यावे, अधारकार्ड नसलेल्या दिव्यांगाचे त्यांच्या घरी जावून अधारकार्ड काढावे, दिव्यांगांना ग्रामपंचायतीने ५ टक्के निधी तत्काळ द्यावा, दिव्यांगाना घरकुल मिळावे. लाभ मिळवून देण्यासाठी घेतली जाणारी चिरीमीरी बंद करावी, लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड, नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांना देण्यात आले. त्यांनी मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्यानंतर मोर्चेकरी रस्त्यावरुन उठले. Parbhani News
यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलींग बोधने, तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, संजय वाघमारे, बाभन ढोणे, चंपतराव सातेफळकर, मदन भोसले, श्रीहरी ईंगोले, सुरेश वाघमारे, बळिराम गुंडाळे, राम सुके आदी उपस्थित होते. तहसिल कार्यालयाचे गेट लावून घेतल्याने मोर्चेक-यांना रस्त्यावरच ठिय्या मांडून बसावे लागले. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
हेही वाचा