Manwat Accident | मानवत रिंगरोडवर ट्रॅक्टर-कारची भीषण धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

दोन ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरची कारला जोरदार धडक; महाराणा प्रताप चौकात पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात
Manwat Ring Road Tractor Car Collision
Manwat Ring Road Tractor Car CollisionPudhari
Published on: 
Updated on: 

Manwat Ring Road Tractor Car Collision

मानवत : मानवत शहरातील रिंगरोडवरील महाराणा प्रताप चौकात दोन ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टर आणि कारची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी (दि. १७) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच २९ सीटी ०३९०) आणि कार (क्र. एमएच १४ सीएच ८७४१) यांच्यात महाराणा प्रताप चौकात जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारमधील सिद्धांत रमेश भाले (रा. आडोळा, ता. माजलगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

Manwat Ring Road Tractor Car Collision
Parbhani News | पाथरीत शिंदे गटाला मोठा धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

या अपघातात कारमधील ऋतुराज संतोष सोळंके (रा. गंगामसला) आणि माऊली शंकर बेलनोर यांच्यासह ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी परभणी येथे पाठविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, सय्यद फय्याज, मुखीद शेख, पोलीस वाहनचालक अविनाश डंबाळे आणि उत्तम धबडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मानवत तालुक्यातील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.