Gharkul Scheme Parbhani | सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार: मानवत शहरात ३७२ घरकुलांना मंजुरी

नगर परिषद अंतर्गत घरकुलासाठी एकूण ५८३ प्रस्ताव प्राप्त
Gharkul Scheme
Gharkul Scheme Pudhari
Published on
Updated on

Manwat Municipal Council housing scheme

मानवत : प्रधान मंत्री आवास योजना २.० अंतर्गत शहरातील तब्बल ३७२ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. शहरातील सर्वसामान्य व गरजू कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

नगर परिषद अंतर्गत घरकुलासाठी एकूण ५८३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३७२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरित प्रस्तावांमध्ये काही कागदपत्रांची त्रुटी असल्याने त्यांची प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे.

Gharkul Scheme
Parbhani News : परभणी जिल्ह्यात रुग्णांसाठी 'उपशामक काळजी सेवा' उपक्रम सुरु

केंद्रीय गृह निर्माण शहरी व्यवहार मार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इ डब्लू es) व निम्न उत्पन्न गटातील (एल आय जी) कुटुंबांना सन्माननीय व सुरक्षित पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे. महिलांच्या नावावर किंवा संयुक्त नावाने घर मंजुरी देण्याच्या अटीमुळे महिला सक्षमीकरणालाही चालना मिळत आहे.

Gharkul Scheme
Parbhani Accident | मानवत बायपास रोडवर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पात्र कुटुंब घरकुलापासून वंचि्त राहणार नाही: डॉ. लाड

शहरातील एकही पात्र कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही. ३७२ घरकुलांना मंजुरी मिळणे ही केवळ सुरुवात आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची त्रुटी तत्काळ दूर करून प्रस्ताव पूर्ण करावेत. छाननी झाल्यानंतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित पात्र लाभार्थ्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळेल.

प्रलंबित प्रस्तावाची छाननी सुरु - मुख्याधिकारी कोमल सावरे

प्रलंबित प्रस्तावांची छाननी सुरू असून संबंधित अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्यांनी तत्काळ त्रुटी पूर्तता करावी. परिपूर्ण कागदपत्रांसह नगर परिषदेत संपर्क साधावा.

Gharkul Scheme
Cyber Crime Parbhani news | अमेरिकेच्या शिक्षण प्रवेशातील ५ हजार डॉलर परत

मंजूर लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना सादर करून घरकुल बांधकामास सुरुवात करावी, जेणेकरून शासन अनुदानाचा लाभ वेळेत मिळेल. अधिक माहितीसाठी नगर परिषद कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत कार्यरत घरकुल अभियंता नारायण व्यवहारे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news