European Roller Bird | ‘घरटी युरोपात, मुक्काम परभणीत; निळ्या पंखांच्या युरोपियन रोलरची रंगीत सफर’

भारतात महिनाभर अधिवास, पक्षीनिरीक्षक माणिक पुरी आणि अशोक राजत यांची नोंद
European Roller
European RollerPudhari
Published on: 
Updated on: 

Parbhani Manwat European Roller

सेलू : निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील चार येथे युरोपमधून प्रवास करत आलेला एक अतिशय देखणा आणि रंगीबेरंगी ‘युरोपियन रोलर’ पक्षी दाखल झाला आहे.

पक्षीनिरीक्षक माणिक पुरी आणि अशोक राजत यांनी या पक्षाची नोंद घेतली आहे. तीन ते चार वर्षांनंतर पक्षीनिरीक्षकांनी या पक्षाची नोंद घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात मालतरान, जल परिसर, शेत शिवरात आता परदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. शनिवारी सकाळी रामपुरी, चार परिसरात पक्षी निरीक्षण भटकंती करताना माणिक पुरी आणि अशोक राजत गेले होते. या दरम्यान ८:२४ च्या सुमारास चार शिवरातील गोदावरी नदीच्या काठाजवळ हा युरोपियन रोलर त्यांच्या निदर्शनास आला. दरवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये हा पक्षी येतो. तो फेब्रुवारीमध्ये मायदेशी परत जातो. काही पक्षी जोडीने भेट परिसरात दिसण्याची नोंद असल्याचे पक्षीनिरीक्षक सांगतात.

European Roller
Parbhani News : लोणी बु. येथील रखडलेला पाणीपुरवठा अखेर सुरू

परदेशी पाहुण्याचा 'शाही लूक'!

१. हा पाहुणा साधासुधा नाही, तर अंगावर देखणा आहे. अंगावर निळा, हिरवट-निळा आणि तपकिरी रंगाच्या आकर्षक छटा असलेला हा ‘युरोपियन रोलर’ पक्षी डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

२. युरोप, पश्चिम व मध्य आशियातील थंड प्रदेशातून लांबचा प्रवास करणाऱ्या या पक्षाने प्रवासादरम्यान परभणीत मुक्काम ठोकला आहे.

शिकार करण्यात एकदम 'क्लासिक'!

नाकतोडे, टोळ, भुंगे आणि सरडे हे या महाराजाचे आवडते खाद्य. उंच झाडांच्या फांदीवर किंवा विजेच्या तारांवर बसून अगदी शांतपणे भक्ष्याची टेहळणी करणारे आणि संधी मिळताच हवेत झेप घेऊन शिकार करणारी, हीच याची वैशिष्ट्ये.

सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १९३ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. माणिक पुरी यांची ही नवीन नोंद परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.

- विजय ढाकणे, पक्षी निरीक्षक, सेलू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.