Parbhani news | तरंगल शिवारात रब्बी ज्वारीवर 'काणी'चे सावट; सोन्यासारखी कणसं काळवंडली

महाबीजकडून खराब बियाणे पुरवठा; शेतकऱ्याची फसवणूक
Parbhani news
Parbhani news
Published on
Updated on

पूर्णा : तालुक्यातील शेत शिवारात यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. अतिवृष्टीमुळे जमीनीत दिर्घकाळ ओलावा टिकून राहिला. त्यामुळे अतिवृष्टीत जरी खरीप वाया गेला तरी पुढील आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांची मदार रब्बीवर होती.

यातच, तरंगल शिवारात शेतकरी अनंत ढोणे यांनी दोन एकर क्षेत्रात महाबिज महामंडळाचे रब्बी ज्वारीचे वाण बियाणे खरेदी करुन पेरणी केली. मात्र,हे ज्वारी पिक सध्या चांगल्या स्थितीत वाढवून कणसं निसवली. यातील दोन एकरातील ज्वारी कणसाला कान्ही (पांढरी काळी)कान्ही उत्पत्ती होवून पन्नास टक्के क्षेत्र बाधित झाले.

महाबिज कडून बोगस इन्फेक्शन झालेले बियाणे पुरवठा केल्यामुळे कणासास कान्ही निर्माण झाली. परिणामी, ज्वारीचे पन्नास टक्के उत्पादन घटून सदर शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. दरम्यान,कणसाला कान्हीची उत्पत्ती होणं म्हणजे इनफेक्शनबाधित बियाण्यामुळे असे होत असते, असी माहिती ताकृअ संतोष भालेराव यांनी सांगितली.

यंदा पूर्णा तालुका परिसरात जवळपास ८६४३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीचा पेरा केला असल्याची माहिती कृषी विभागातील सुपरवायझर बळवंत यांनी दिली. यात, घरचे बियाणे पेरणी केले त्या ज्वारीच्या कणसाला कान्ही उत्पत्ती झाली नसून महाबिज बियाणे लागवड केलेल्या ज्वारीला कान्ही निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सदरील शेतकरी महाबिज बियाणे महामंडळाने फसवणूक केली असून नुकसान भरपाईची मागणी कृषी विभागाकडे करणार आहे. ज्वारी क्षेत्राची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news