परभणी: इसादच्या सरपंचपदी ज्योती सातपुते यांची बिनविरोध निवड

परभणी: इसादच्या सरपंचपदी ज्योती सातपुते यांची बिनविरोध निवड

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : इसाद ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी ज्योती सातपुते यांची बुधवारी (दि.१३) बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीसाठी झालेल्या सभेत १३ पैकी १३ सदस्यांनी स्पष्ट बहुमताने त्यांची निवड केली. निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सूर्यकांत कवळे, ग्रामविकास अधिकारी एस. एम. भीमानपलेवार यांनी कामकाज पाहिले.

तालुक्यातील इसाद ग्रामपंचायतच्या सरपंच उद्धवराव सातपुते यांनी दि. १७ सप्टेंबरला मुदतपूर्व राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त सरपंच पदासाठी ज्योती सातपुते यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. त्यामुळे बिनविरोध त्यांची सरपंच पदी निवड झाली. यावेळी मावळत्या सरपंच सविता सातपुते, उपसरपंच कांताबाई भोसले, सदस्य किशोरी भोसले, सीताबाई भोसले, सविता सातपुते, मारोती सातपुते, बाळासाहेब भोसले, परसराम राठोड, चंद्रशेखर साळवे, लोचनाबाई दनकटवड, प्रभावती शिंदे, जागृती नरवड आदी उपस्थित होते.

ज्योती सातपुते यांची सरपंचपदी निवड होताच सर्व सदस्यांनी आणि प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच ज्योती सातपुते या शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल सातपुते यांच्या सुविद्य पत्नी होत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news