Manvat News | औद्योगिक रेखांकनासाठी राखीव जमिनीचे सपाटीकरण; मानवत पालिका, तहसील व पोलिसांची संयुक्त कारवाई

नगर परिषदेकडून १९८८ साली भूसंपादन करून सुमारे ५ हेक्टर ०९ आर क्षेत्र औद्योगिक रेखांकनासाठी राखीव
Industrial Land Development Manvat
Industrial Land Development ManvatPudhari
Published on
Updated on

Industrial Land Development Manvat

मानवत : शहराच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मानवत नगर परिषदेकडून बुधवारी (ता. १) तहसील व पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात आली. औद्योगिक रेखांकनासाठी राखीव असलेली जमीन काटेरी झुडपांमधून मुक्त करत सपाट करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे काहींचे मनसुबे उधळल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

नगर परिषदेकडून १९८८ साली भूसंपादन करून सर्व्हे क्रमांक ३७७/१ व ३७८/१ मधील सुमारे ५ हेक्टर ०९ आर क्षेत्र औद्योगिक रेखांकनासाठी राखीव ठेवण्यात आले होते. संबंधित जमीनधारकांना नियमानुसार मोबदला देऊन ही जमीन अधिकृतरीत्या संपादित करण्यात आली होती.

Industrial Land Development Manvat
Manvat Municipal Council | मानवत नगरपरिषदेत ऐतिहासिक ठराव मंजूर: जाचक मालमत्ता करास अखेर स्थगिती

मात्र, गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली होती. तसेच उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक पुढे येत असतानाही काही व्यक्तींनी दबाव टाकत अडथळे निर्माण केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या जागेचा प्रत्यक्ष औद्योगिक वापर दीर्घकाळ रखडला होता.

या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलत मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई मोहीम राबवून झुडपे हटविण्यात आली.

या कारवाईवेळी कर निर्धारक व प्रशासकीय सेवा अधिकारी रामराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अजय उडते (नगररचना सहाय्यक), सय्यद अन्वर सय्यद अशफाक (नगर अभियंता), भागवत भोसले (स्थापत्य अभियंता), मुंजा गवारे (स्वच्छता निरीक्षक), पंकज पवार (विद्युत विभाग), राजेश शर्मा (कर निर्धारक – नामांतर विभाग), भारत पवार (कर निरीक्षक) तसेच बळीराम दहे, दीपक भदरगे, सुनील कीर्तने आदी कर्मचारी उपस्थित होते.

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

Industrial Land Development Manvat
Manvat Politics | मानवतच्या विकास निधीवरून पालकमंत्री - आमदारांमध्ये सोशल मीडियावर रंगला श्रेयवाद

उद्योगवाढीसाठी महत्त्वाचा टप्पा – डॉ. अंकुश लाड
शहरात उद्योगधंदे वाढून रोजगारनिर्मितीला चालना मिळावी, यासाठी औद्योगिक रेखांकनाची जागा मोकळी करणे आवश्यक होते. काहींच्या दबावामुळे उद्योग उभारणीत अडथळे येत होते; मात्र आता ही जमीन पूर्णपणे विकासासाठी उपलब्ध झाली आहे. नगरपालिकेच्या या ठोस कारवाईमुळे अनेक वर्षे वादग्रस्त ठरलेली जागा विकासाच्या मार्गावर आली असून मानवतच्या औद्योगिक प्रगतीस गती मिळेल, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news