

पाथरी : गेल्या दोन दिवसांपासून पाथरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील अनेकांची शेती सोमवारी (दि.२) पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ओढे-नाले तुंडूंब वाहत असून काही घरामध्ये पाणी शिरले आहे.
तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, मुग, तुर ही पिके चांगल्या प्रमाणात आली होती. मात्र तालुक्यात शनिवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी कापूस व सोयाबीनचे पीक आडवे झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.