मुंबई : प्रतिनिधी
मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाण्यात अनेक ठिकाणी आज शुक्रवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला आहे. वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, सायन, वडाळा परिसरात पावसाने जोर धरला आहे. कल्याण- डोंबिवलीतही पावसाची रिपरिप सूरू आहे. नवी मुंबई, पालघरमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. मुलुंड, भांडूप घटकोपर परिसरात पाऊस सुरु आहे.
ठाण्यालाही जोरदार पावसाने झोडपले आहे. येथील रस्ते जलमय झाले आहेत. मालाड भागात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला. गेली काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आज सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.