गंगाखेड शहर, तालुक्यात डीजेमुक्त मिरवणुकीने बाप्पाला निरोप

Ganpati Visarjan 2024 | उपविभागात ३४३ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन
Parbhani Ganpati Visarjan
गंगाखेड शहर, तालुक्यात डीजेमुक्त मिरवणुकीने बाप्पाला निरोप file photo
Published on
Updated on
प्रमोद साळवे

गंगाखेड : 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा गगनभेदी घोषणारुपी गर्जनेने तसेच डीजे मुक्तीच्या क्रांतिकारी पाऊलाने पारंपारिक वाद्याच्या तालावर नाचत-गाजत प्रचंड जल्लोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप (Ganpati Visarjan 2024) दिला. नवा मोंढ्याचा राजा, जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा शिवकालीन शस्त्र प्रदर्शन जिवंत देखावा लक्षवेधी ठरला. पारंपारिक मार्गाने सहभाद्य मिरवणुकीनंतर परळी राष्ट्रीय महामार्गावरील सानप यांच्या शेतातील खदानित गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

यावर्षीचे गणेश विसर्जन (Ganpati Visarjan 2024) गंगाखेड शहर व तालुक्यासाठी क्रांतिकारी पाऊल ठरले. पोलीस व महसूल प्रशासनाने अभियान म्हणून हाती घेतलेल्या डीजेमुक्तीचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. डीजेमुक्तीचा 'श्रीगणेशा' यानिमित्ताने अंमलात आला. पोलीस यंत्रणा, महसूल प्रशासन, नगर पालिका प्रशासन, शांतता समिती सदस्यांचं समर्पण, लोकप्रतिनिधींचं डीजेमुक्तीला मिळालेलं पाठबळ व गणेश मंडळांच्या समन्वयी भुमिकेचा अंमल क्रांतिकारी ठरला. याच क्रांतीतून गंगाखेड, पिंपळदरी व सोनपेठ या पोलीस उप विभागातील नोंदणीकृत ३४३ सार्वजनिक गणरायांचे 'निर्विघ्न' विसर्जन झाले. यामध्ये गंगाखेड पोलीस स्टेशन अंतर्गत १४२, पिंपळदरी पोलीस स्टेशन अंतर्गत ६२ तर सोनपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत १३९ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शांततापूर्ण व निर्विघ्न गणेश विसर्जनासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार उषा शृंगारे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पिंपळदरीचे पोलीस प्रभारी सुर्यवंशी, सोनपेठचे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोमलवाड, नगर पालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणेंसह अधिकारी-कर्मचारी, गंगाखेड- पिंपळदरी- सोनपेठ पोलीस स्टेशन अंतर्गतचे अधिकारी- कर्मचारी व शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी- सदस्य, विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांचा सहभागाची निर्विघ्न गणेश विसर्जनाला मदत मिळाली.

प्रशासनाचा निश्चय, लोकप्रतिनिधींचं पाठबळ अन् 'डीजेमुक्ती'ची क्रांती

गंगाखेड शहरात डीजे बंदी यशस्वी होईल का? याबाबत पूर्वइतिहास पाहता काही अंशी साशंकता होती. मात्र प्रशासनाच्या निश्चयाला लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाल्याने क्रांती झाली. खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे आणि आमदार राजेश विटेकर यांनी पोलीस उपविभागातील गणेश विसर्जनासाठी अभियानाला पाठबळ दिले. आ. गुट्टे यांनी शांतता बैठकीतच डीजेमुक्त अभियानास पाठिंबा दिला. गंगाखेड शहरात मिरवणुकीत डीजे लावणारच, अशी आग्रही भूमिका घेणाऱ्या एका मंडळाच्या सदस्यांस समजूतीसाठी स्वतः खा. जाधव तातडीने गंगाखेडला पोहोचले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. तर आ. विटेकर यांनी गंगाखेड व सोनपेठ तालुका पोलीस ठाणेअंतर्गत डीजेमुक्त अभियानास सहकार्य केले.

Parbhani Ganpati Visarjan
Ganesh Visarjan 2024 : मुंबईत उसळला लाखो भक्तांचा महासागर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news