

Gangakhed houses damaged rain
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव डोंगर, कोदरी, बडवणी, सिरसम तसेच परिसरातील गावांमध्ये आज (दि.१५) पहाटे 4 ते 7 च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अचानक आलेल्या पावसाच्या प्रकोपामुळे घरांचे व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गावांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाचे पथक आज घटनास्थळी दाखल झाले. या वेळी गंगाखेडचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनस्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांसोबत चर्चा करून नुकसानीचा पंचनामा करण्याच्या तसेच तातडीने मदत व उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावकऱ्यांनी मोठ्या नुकसानीबाबत प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली.