Parbhani Firing on Professor House- प्राध्यापकाच्या घरावर गोळीबार; ४ ते ५ राऊंड फायर

परभणीत धक्कादायक घटना; पोलिसांकडून तपास सुरू
Parbhani Firing on Professor House
सुजाता नगर येथे प्राध्यापकाच्या घरावर गोळीबार करण्यात आलाpudhari photo
Published on
Updated on

परभणी : शहरातील सुजाता नगर परिसरात बुधवारी (दि. १५) रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली. येथील प्राध्यापक गौतम मुंडे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Parbhani Firing on Professor House
Parbhani Politics : परभणी झेडपीत खाते वाटपावरून सत्तासंघर्ष; अंतर्गत वादातून सभेत प्रचंड गदारोळ

प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी मुंडे यांच्या घरावर ४ ते ५ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, मात्र घराच्या बाहेरील भागाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पंचनामा करून परिसराची पाहणी केली. असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमागे जुना वाद किंवा किरकोळ कारण असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्राध्यापक मुंडे यांच्याशी संबंधित वैयक्तिक किंवा अन्य वादांची माहितीही तपासली जात आहे.

Parbhani Firing on Professor House
Purna Chana Purchase | पूर्णेत बारदानाअभावी हरभरा खरेदी ठप्प; चेअरमनचे पालकमंत्र्यांना साकडे

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परभणी शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news