

चारठाणा : चारठाणा येथून जवळच असलेल्या मौजे बेलोरा येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवारी (दि.२) दुपारी दोनच्या सुमारास घडली. संतोष पंढरीनाथ खुपसे (वय ३२, रा. बेलोरा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मौजे बोलोरो येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष खुपसे याने शेतीच्या कामासाठी बँकेतून कर्ज घेतले होते. शेतीतून योग्य उत्पत्न मिळत नसल्याने तो नाशिक येथे खाजगी नोकरीला लागला होता. मात्र बँकेकडून कर्जासाठी तगादा सुरूच होता. संतोष गणेश उत्सवासाठी सहकुटुंब गावाकडे आला होता. यादरम्यान कर्जबाजारीपणामुळे नैराश्येत असलेल्या संतोषने मंगळवारी (दि.२) शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. परिसरात गणेशोत्सवाच्या तोंडावर दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.