परभणी: अवकाळी पावसामुळे ताडकळस परिसरात दुबार पेरणीचे संकट

परभणी: अवकाळी पावसामुळे ताडकळस परिसरात दुबार पेरणीचे संकट
Published on
Updated on

ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना कोवळे पीक मोडून नव्याने हरभरा, ज्वारी, गव्हाची पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी दुबार पेरणीचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

ताडकळस व परिसरातील कळगाव, कळगाववाडी, धानोरा काळे, बानेगाव, महागाव, मुंबर, फुलकळस, खंडाळा, माखणी, खाबेगाव, एकरुखा, निळा, सिरकळस, बलसा, गोळेगाव, माहेर येथे हरभरा पिकाचे २७ व २९ नोव्हेंबरच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हरभरा पीक पूर्णपणे वाया गेले आहे. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी सुरू केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे शासनाने अद्यापही केलेले नाहीत.

पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ताडकळस व परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने खरीपातील कापूस, तूर पिकांचेही नुकसान झाले आहे. तर अवकाळी पावसामुळे रब्बी तीळ करडई, ज्वारी, गहू, हरभरा पिकांचेही नुकसान झालेले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news