Parbhani Crime News : ग्रामपंचायत वादातून गावठी कट्टा आणल्याचा कट उधळला

दोन आरोपींसह ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
Parbhani Crime News
Parbhani Crime News : ग्रामपंचायत वादातून गावठी कट्टा आणल्याचा कट उधळलाfile photo
Published on
Updated on

Parbhani Crime News: Plot to procure a country-made gun amidst Gram Panchayat dispute foiled

सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या वादातून झालेल्या जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे आणल्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Parbhani Crime News
Jalna illegal sand mining : अवैध वाळूसह 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी (दि. २७) गंगाखेड विभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, सोनपेठ तालुक्यातील मौजे धामोनी येथील विठ्ठल गुंजाळ व त्याचा नातेवाईक आशिष सावंत यांनी जुन्या वादातून विरोधकांचा खून करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे आणली आहेत.

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या कारणावरून झालेल्या वादात विठ्ठल गुंजाळ यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी गणेश मुळे व इतरांविरुद्ध दैठणा पोलिस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

Parbhani Crime News
Nanded Crime : नांदेडमध्ये दोन पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त

त्यांच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्तूल), ६ जिवंत काडतुसे आणि २ मोबाईल असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. ही कारवाई सपोनि. जायभाये, फौजदार परिहार, महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, सचिन भदर्गे, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार आणि चालक महारुद्र सपकाळ यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news