Parbhani crime : ट्युशनला जाणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार;  संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे
Minor Assault Case
Minor Assault CasePudhari
Published on
Updated on

पूर्णा : पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोहम एंगडे (रा. पळशी, ता. वसमत, जि. हिंगोली) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे.

Minor Assault Case
Sambhajinagar Crime News : पोलिस उपायुक्तांच्या रायटरवर बलात्काराचा गुन्हा

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी १४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली होती. यावेळी आरोपी सोहम एंगडे याने तिला गाठले आणि "तुझ्याशी काही बोलायचे आहे...," असे सांगत जबरदस्तीने ट्युशनजवळील ऊसाच्या शेतात ओढून नेले. तिथे आरोपीने तिचे तोंड दाबून अमानवीय अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या वडील आणि भावाला जिवे मारून टाकीन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली.

Minor Assault Case
Nagpur crime news : नागपूर ग्रामीण पोलिसांचा ‘रेकॉर्डवरील गुन्हेगारां’वर वॉच; ७५१ आरोपींची घेतली परेड

धैर्याने केली तक्रार, यानंतर पोलीस कारवाई

या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने हिंमत न हारता घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांच्या मदतीने तिने पूर्णा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सोहम एंगडे याच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम ६४(१), ६४(२)(आय), ६५(१), ३५१(३) सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ च्या कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news