Sambhajinagar Crime News : पोलिस उपायुक्तांच्या रायटरवर बलात्काराचा गुन्हा

विवाहितेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून अत्याचार; जवाहर नगर पोलिसांत गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक फरार
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : पोलिस उपायुक्तांच्या रायटरवर बलात्काराचा गुन्हाfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar Crime News: Rape case against Deputy Commissioner of Police's writer

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यानेच एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिमंडळ-२ च्या उपायुक्तांचा 'रायटर' म्हणून काम पाहणारा श्रेणी उपनिरीक्षक हरीष माधवराव खटावकर (५३, रा. सारा वैभव, जटवाडा रोड) याच्याविरुद्ध बुधवारी (दि. १५) रात्री उशिरा जवाहरनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; १७ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार, तरूणावर गुन्हा दाखल

पीडित ४८ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, ती एका खासगी शाळेत शिक्षिका असून, तिची आणि आरोपी उपनिरीक्षक हरीष खटावकर याची गेल्या चार वर्षांपासून ओळख होती. मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर खटावकर याने पीडितेला वारंवार फोन करून आणि 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे मेसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेने 'माझे लग्न झालेले आहे, नवऱ्याला समजले तर तो सोडणार नाही' असे सांगून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याने बदनामीची धमकी दिली. २७ मे २०२५ रोजी खटावकर याने पीडितेला कामानिमित्त 'हॉटेल' येथे बोलावून तिच्यावर पहिल्यांदा बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२५ रोजी 'घराचे इंटेरियर सुरू आहे ते पाहण्यासाठी ये' असा बहाणा करून खटावकरने पीडितेला जटवाडा रोडवरील स्वतःच्या घरी बोलावले आणि पुन्हा शारीरिक संबंध ठेवले. 'नकार दिल्यास नवऱ्याला सांगेन' अशी धमकी देत त्याने तिला गप्प राहण्यास भाग पाडले.

Sambhajinagar Crime News
Parbhani Crime | पूर्णा येथे वकिलाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ४५ लाखांच्या खंडणीप्रकरणी तिघे जेरबंद

कारमध्ये मारहाण करून खाली ढकलले

बुधवारीच संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास खटावकर पीडितेच्या घरी पोहोचला. पार्किंगमध्ये असलेल्या पीडितेला त्याने जबरदस्तीने आपल्या कारमध्ये (एमएच-१४-२८४८) बसवले. गाडीत लड्डू भाई हा चालक होता. चालत्या गाडीत खटावकर याने पीडितेला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चालक गुहुने त्याला थांबवण्याची विनंती करूनही तो ऐकला नाही. अखेर खटावकर याने पीडितेचा मोबाईल हिसकावून घेतला आणि रात्री १० वाजेच्या सुमारास अमरप्रीत सिसलजवळ गाडीतून खाली उतरून देत पोबारा केला.

पतीला लागला सुगावा

बुधवारी (दि. १५ जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडितेच्या पतीने खटावकरचे मेसेजपाहिल्यानंतर त्याला फोन करून जाब विचारला. तेव्हा निर्दावलेल्या खटावकरने 'होय, मी मेसेज केले, माझे तिच्यावर प्रेम आहे' असे उत्तर दिले. यावरून पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला आणि पतीने पीडितेला घराबाहेर काढले.

भर चौकात सोडून पसार

खटावकर याने पीडितेला अमरप्रीत चौकात सोडून दिल्यानंतर तिने एका अनोळखी व्यक्तीच्या फोनवरून आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि पतीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून हरीष खटावकर याच्याविरुद्ध तक्रार दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news