

पूर्णा : वाई लासीना (ता. पूर्णा ) येथे एका ९ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. राजकुमार उर्फ चिकू माणिक डाखोरे (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई लासीना येथे गुरुवारी (दि.१) लग्न होते. लग्न लागल्यानंतर राजकुमार हा मुलांसोबत पंक्तीत जेवण वाढत होता. त्यानंतर तो मित्रा सोबत गावा शेजारील विहिरीकडे गेला. उशिरा पर्यंत घरी परतला नसल्यामुळे आई वडिलांसह गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता एका विहिरीजवळ त्याचे कपडे आढळून आले. विहिरीत उतरुन पाहिले तर राजकुमार मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर आई वडिलांनी हंबरडा फोडला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.