

Palkhi at the Selu Vyankushaha Maharaj pilgrimage festival
सेलू; पुढारी वृत्तसेवा :
सेलू नगरीचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सवानिमित्त गुरुवारी शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. गोपाळकृष्ण श्री केशवराज बाबासाहेब महाराज की जयच्या जयघोषाने आणि टाळ-मृदुंगाच्या गजराने सेलू शहर दुमदुमून गेले.
दत्त जयंती हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी ४ वाजता मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या पालखीचे मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
यावेळी महिला आणि पुरुष भजनी मंडळांनी सादर केलेल्या अभंग, गवळणी आणि भारुडांनी वातावरणात रंगत आणली. भाविकांनी पारंपरिक कानगी प्रसादाचा लाभघेतला. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू होता.