Student Abuse : पडेगाव हादरले! शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण

ग्रामस्थांचा संताप, निलंबनाची मागणी
Student Abuse |
Student Abuse : पडेगाव हादरले! शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण (Pudhari File Photo)
Published on
Updated on

Student Abuse

गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थ्याला जातिवाचक शिवीगाळ करत मांसाहार करण्यावरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाबासाहेब हाके असे या शिक्षकाचे नाव असून, या प्रकारामुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेत हाके यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.

Student Abuse |
Student Abuse Case | सनमडी आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकास अटक

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. शिक्षक बाबासाहेब हाके यांनी शाळेतील एका विद्यार्थ्याला त्याच्या जातीवरून अपमानास्पद वागणूक दिली. 'तू मांसाहार करतोस' असे म्हणत त्याला जातिवाचक शिवीगाळ केली आणि शारीरिक मारहाणही केली, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थ्याने घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

ग्रामस्थांच्या इतरही गंभीर तक्रारी

ग्रामस्थांनी केवळ या एका घटनेवरच बोट ठेवले नसून, शिक्षक हाके यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या तक्रारींनुसार शिक्षक हाके हे अनेकदा शाळेत गैरहजर असतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय सणांच्या दिवशीही ते शाळेत उपस्थित राहत नाहीत. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्याकडून स्वतःची वैयक्तिक कामे करवून घेतली जातात. त्यांचे वर्तन विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे आहे.

प्रशासनाकडे धाव, कारवाईची मागणी

या गंभीर प्रकारानंतर, ग्रामस्थांनी एकत्र येऊन परभणीच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे एक लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर विठ्ठल घोडके, रुस्तुम आगलावे, कासिम शेख, मुबारक पठाण, माधव व्हावळे, गुलाब शेख, युनुस पठाण, रामभाऊ वरकडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिक्षकाच्या या वर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पडेगावमधील या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाकडून असे वर्तन होणे हे अत्यंत निंदनीय असून, यामुळे गावातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. आता शिक्षण प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न असल्याने या प्रकरणी तातडीने चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Student Abuse |
School abuse case : शालेय विद्यार्थिनींची कपडे काढून केली तपासणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news