Parbhani Crime : अल्पवयीन मुलीची छेडछाड, आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Parbhani Crime News
अल्पवयीन मुलीची छेडछाड, आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीpudhari photo
Published on
Updated on

परभणी : कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. त्रिभुवन यांनी आरोपी सोनुसिंग पुनमसिंग टाक (वय 28, रा. जिल्हा परिषद समोर, परभणी) यास एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.

पीडित अल्पवयीन मुलीने 6 सप्टेंबर 2019 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपी सोनुसिंग टाक हा मोटारसायकलवरून शांतिनिकेतन कॉलनी परिसरातील माऊली चौक, गुरुकृपा चौक तसेच पेडगाव रोडवरील ट्युशन क्लासपर्यंत तिचा पाठलाग करीत होता. तसेच तू मला खूप आवडतेस असे म्हणत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून छेडछाड करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

Parbhani Crime News
IAS Avinash pathak : तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी!

तक्रारीनंतर दामिनी पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्ह्यासह पोक्सो कायद्यान्वये कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले. सादर पुरावे व साक्षींच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद करत शिक्षा सुनावली. मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. पाचपोर यांनी काम पाहिले.

Parbhani Crime News
Aniket Kothale murder case: राखीव दलाबाबतचा आरोप खोटा

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागोजी कुंडगिर तसेच स्पेशल पोक्सो ट्रायल मॉनिटरिंग सेलमधील वंदना आदोडे व धबडगे यांनी प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news