Aniket Kothale murder case: राखीव दलाबाबतचा आरोप खोटा

उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद : आज पुन्हा होणार सुनावणी
Aniket Kothale murder case
Aniket Kothale murder case: राखीव दलाबाबतचा आरोप खोटाPudhari
Published on
Updated on

सांगली : बचाव पक्षाने फेरतपासादरम्यान (क्रॉस) स्ट्राइकिंग फोर्सकडील नोंदीबाबत न्यायालयासमोर आणलेला पुरावा खोटा असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अंतिम युक्तिवादाच्या सुनावणीदरम्यान केला.

बचाव पक्षाने फेरतपासादरम्यान अनिकेतच्या खुनाच्या दिवशी पोलिस मुख्यालयातील स्ट्राइकिंग फोर्स (राखीव पोलिस) यांच्या लॉग बुक व खुनादिवशीच्या घटनेच्या वेळेची तफावत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. ॲड. निकम यांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी अंतिम युक्तिवाद सुरू आहे.

ॲड. निकम यांनी घटनाक्रम, गुन्हा लपविण्याच्या व पुरावे नष्ट करण्याविषयी संशयितांनी केलेल्या कृत्यांचा न्यायालयासमोर पाढाच वाचला व गुन्ह्याची क्रमवारी सांगितली. ॲड. निकम म्हणाले, दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 8 ते 9 चे दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना उपनिरीक्षक युवराज कामटे, हवलदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला या पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. अनिकेतच्या खुनास सर्व संशयित जबाबदार आहेत. युक्तिवादादरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी अनेक आक्षेप नोंदविले. ते आक्षेप ॲड. निकम यांनी फेटाळून लावले.

आंबोली येथे मिळालेले मृतदेहाचे अवशेष अनिकेत कोथळेचेच आहेत, ते न्यायवैद्यक तज्ञाकडून शाबित झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. या खटल्याची पुढील सुनावणी आज, शनिवारी पुन्हा होणार आहे. शुक्रवारी सुनावणीदरम्यान सीआयडीचे तत्कालीन उपअधीक्षक व मुख्य तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, बचाव पक्षाचे ॲड. प्रमोद सुतार, सीआयडीच्या अधीक्षक जयश्री गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक प्रमोद नलावडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news