Parbhani News : विनापरवाना गावठी पिस्टलसह एकास पकडले तर एक फरार

गावठी पिस्टल ताब्यात बाळगून दशहत निर्माण करत असताना स्थागुशा पथकासह पूर्णा पोलीसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले.
Parbhani News
Parbhani News : विनापरवाना गावठी पिस्टलसह एकास पकडले तर एक फरारfile photo
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालूक्यातील एरंडेश्वर येथे शुक्रवारी एकजण विनापरवाना बेकायदेशीर गावठी पिस्टल ताब्यात बाळगून दशहत निर्माण करत असताना स्थागुशा पथकासह पूर्णा पोलीसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले. त्याच्याजवळील १ विनापरवाना गावठी पिस्टल, १ पिवळे रंगाचे धातूचे जिवंत काडतूस जप्त केले. यातील एकजण फरार झाला.

Parbhani News
Ganeshotsav 2026 | पाचशे वर्षांची परंपरा असलेला सेलू शहरातील 'मेंढ्या गणपती'

तालूक्यातील एरंडेश्वर येथील हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी (दि.१८) ११ वाजता मुकेश शेषेराव खाडे (वय २२, रा. हट्टा ता. वसमत जि. हिंगोली) याने बुध्दभूषण भगवान खिल्लारे रा. आंबेडकर नगर हिंगोली यांच्याकडून गावठी पिस्टल घेवून विनापरवाना बेकायदेशीर स्वतः च्या ताब्यात बाळगून जिल्हाधिकारी यांचे शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करुन दशहत निर्माण केली.

ही माहिती पूर्णा पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मुकेश खाडे यास शिताफीने अटक केली. यातील पिस्टल देणारा एकजण फरार असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत. घटनेत एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Parbhani News
ST Reservation : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचे तिरडी आंदोलन

रामकिशन काळे यांच्या फिर्यादीवरून मुकेश शेषेराव खाडे, बुध्दभूषण भगवान खिल्लारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन पाटील हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news