Digital Guru : गणित-विज्ञान शिकणार आता डिजिटल गुरुंकडून

१५ लाख विद्यार्थ्यांना मोफत ई-साहित्य ; ६० टक्के शाळांमध्ये अंमलबजावणी
Digital Guru
Digital Guru : गणित-विज्ञान शिकणार आता डिजिटल गुरुंकडूनfile photo
Published on
Updated on

Now learn Math and Science from digital gurus

परभणी, नरहरी चौधरी: गणित व विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांचे आकलन अधिक भक्कम व्हावे, अवघड संकल्पना डिजिटल माध्यमातून सहज समजाव्यात आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य विनामूल्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्याचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Digital Guru
Parbhani Rain : सोयाबीन पिकांची शिवारं वाळली; खरीप हंगाम धोक्यात

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच्या या कार्यक्रमातून चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांना खान अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवारील ई-साहित्य विनाशुल्क वापरण्याची संधी उपलब्ध झाली. विशेष म्हणजे, राज्यातील जवळपास ६० टक्के शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे. गणित आणि विज्ञान हे विषय अनेक विद्यार्थ्यांना तुलनेने अवघड वाटतात. पारंपरिक पद्धतीने अध्यापन करताना काही संकल्पना विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजण्यास अडचणी येतात.

हीच अडचण दूर करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला. राज्याच्या अभ्यास क्रमाशी सुसंगत असलेल्या खान अकॅडमीच्या डिजिटल व्यासपीठावर विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक घटकांचा अभ्यास, पुनरावृत्ती आणि सराव करता येणार आहे. खान अकॅडमीच्या प्लॅट फॉर्मवर विद्यार्थ्यांसाठी २ हजारांहून अधिक जागतिक दर्जाचे शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध आहेत.

यासोबतच ४ हजारांहून अधिक सराव प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविता येणार आहेत. प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र चाचण्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे एखादा धडा किंवा संकल्पना शिकून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या आकलनाची चाचणी घेता येणार आहे. शाळेत शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यास-क्रमाचा पुनराभ्यास करण्यासह एखादी संकल्पना पुन्हा समजून घेण्यासाठी या डिजिटल साहित्याचा उपयोग होणार आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार अभ्यास करता येत असल्याने डिजिटल शिक्षणाला घरच्या अभ्यासाचीही जोड मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभइयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत आहे.

Digital Guru
Parbhani News : वसतिगृहातून पळालेली तीन मुले पोलिसांनी केली पालकांच्या स्वाधीन

कार्यक्रमांतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांना खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर करून देत आहेत. वर्गातील अध्यापनासह डिजिटल माध्यमातून अतिरिक्त सराव उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शैक्षणिक साहित्य समान पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा पैलू आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील तफावत कमी करण्या-साठीही डिजिटल माध्यम प्रभावी ठरू शकते.

नियोजनबद्ध सराव

शिक्षकांना सक्षम करणारे डिजिटल व्यासपीठखान अकॅडमी हे गणित, विज्ञान व इंग्रजीच्या अध्ययन-सरावासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे मोफत डिजिटल व्यासपीठ आहे. स्वतंत्र आयडीद्वारे विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध शैक्षणिक कंटेंट व सराव देता येतो. तसेच त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेऊन क्षमतेनुसार शिक्षण देता येते. शिक्षकांची जागा घेण्याऐवजी त्यांच्या अध्यापनाला अधिक प्रभावी करणारे तंत्रज्ञान म्हणून खान अकॅडमीकडे पाहिले पाहिजे, असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news