Parbhani Accident | नांदेड–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर स्कार्पिओ पलटी; तिघेजण गंभीर जखमी

पिंपरी गीतेजवळ घटना, जखमींना जालना येथे हलविले
Nanded Sambhajinagar highway accident
पलटी होऊन झालेल्या अपघातात स्कार्पिओचे मोठे नुकसान झाले Pudhari
Published on
Updated on

Nanded Sambhajinagar highway accident
चारठाणा : नांदेड–छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील पिंपरी गीतेजवळ स्कार्पिओ वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंठा येथून नांदेडकडे लग्न समारंभासाठी जाणारी स्कार्पिओ (क्रमांक एमएच 45 ए क्यू 9504) बुधवारी (दि. ११) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास चारठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावरील पिंपरी गीतेजवळील पुलाजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर वाहनाने अनेक पलट्या घेतल्या.

Nanded Sambhajinagar highway accident
Parbhani accident news | अकोली पुलावर अपघातात उज्जैनला निघालेल्या चार भाविकांचा मृत्यू

या वाहनात चालकासह पाच जण प्रवास करत होते. त्यापैकी शोहिद शरीफ आकार (वय २२), आबिद गणी शेख (वय २३) व अरबाज कुरेशी (वय २३, सर्व रा. मंठा) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तात्काळ चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविले.

दरम्यान, अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news