Parbhani News | 'पूर्णा तहसील'समोर निराधार महिलांसह मुकुंद भोळे यांचे आजपासून आमरण उपोषण

आमदार गुट्टे यांच्याकडून उपोषण थांबविण्याची विनंती
Mukund Bhole hunger strike in Purna
'पूर्णा तहसील'समोर निराधार महिलांसह मुकुंद भोळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी तहसिल कार्यालयासमोर निराधार महिलांसह सामाजिक कार्यकर्ते मुकुंद भोळे यांनी आजपासून (दि.२४) आमरण उपोषणाला सुरूवात केली. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ दलित आघाडीच्या वतीने हे उपोषण करण्यात येत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मागील अनेक दिवसांपासून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येत होता.परंतु, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेले दलित आघाडीचे कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मुकुंद भोळे यांच्या पुढाकारातून असंख्य पुरुष व महिला नागरिकांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला.

दरम्यान, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या सोडवल्या जातील. उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी देखील व्हिडिओ कॉल करुन मुकुंद भोळे यांच्याशी संपर्क साधून आपल्या मागण्यांची दखल घेऊन त्या तत्काळ सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. आणि उपोषण थांबविण्याची विनंती केली.

Mukund Bhole hunger strike in Purna
परभणी : तलावात बुडून मच्छीमार तरुणाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news