Parbhani Agriculture News : दुष्काळाच्‍या झळांतही ठिबकवर फुलविली गोदावरी तूर; कमी पाण्यात शेंगांचा बहर

कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र येथील डॉ. गजानन गडदे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांच्या मार्गदर्शनात लागवडीपासून पीक संरक्षणापर्यंत योग्य नियोजन
Drought Resistant Farming
Drought Resistant Farmingpudhari photo
Published on: 
Updated on: 

ताडकळस : परिसरात यंदा दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी पाण्याच्या टंचाईने त्रस्त आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही माखणी येथील पुरस्कारप्राप्त प्रगतशील महिला शेतकरी मीरा आवरगंड यांनी ठिबक सिंचनचा प्रभावी वापर करीत गोदावरी तुरीचे पीक फुलविले. कमी पाण्यात तुर पिकाला आलेला शेंगांचा बहर त्यांच्या नियोजनबद्ध शेतीचा प्रत्यय देत आहे.

वनामकृविने प्रसारित केलेल्या गोदावरी तूर वाणाची त्यांनी एक बाय चार फूट अंतरावर लागवड केली. हळद पिकात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करून उपलब्ध जमिनीचा योग्य वापर साधला. सध्या तुरीच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फुले व शेंगा लागल्या. कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र येथील डॉ. गजानन गडदे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांच्या मार्गदर्शनात त्यांनी लागवडीपासून पीक संरक्षणापर्यंत योग्य नियोजन केले.

Drought Resistant Farming
Beed Illegal Sand Transport Police Action|पहाटे टिप्पर भरून आणलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाण्याची कमतरता असतानाही ठिबक सिंचनाद्वारे आवश्यक पाणी देत पिकाची जोपासना केली. योग्य लागवड अंतर, वेळेत व्यवस्थापन व तज्ज्ञांचे मार्गदर्शनामुळे दुष्काळी परिस्थितीतही तुरीचे पीक बहरले. मीरा आवरगंड यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या केवळ शेती उत्पादनापुरत्या मर्यादित नाहीत. स्वतः तुरीचे खळे करून डाळ तयार करणे, तिचे लहान पॅकेटमध्ये पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री करणे असा त्यांचा उपक्रम आहे.

शिवाय हळद, हळदीचे व आंब्याचे लोणचे, पापड, कुरडया, उटणे व आंब्याच्या कोयीपासून सुपारी तयारचे घरगुती प्रक्रिया उद्योगही त्या चालवतात. शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत त्यांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. दुष्काळातही जिद्द, आधुनिक तंत्रज्ञान व योग्य नियोजन बळावर शेतीत यश मिळविता येते हे त्यांनी प्रयोगातून दाखवून दिले.

Drought Resistant Farming
Latur Sugarcane Rate Protest : ऊस काटामारीविरोधात संघर्ष समिती आक्रमक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.