Parbhani News : ३३ केव्ही सबस्टेशनला भीषण आग; परभणीचा २५ टक्के वीजपुरवठा ठप्प

दर्गा रोड परिसरात खळबळ; संपूर्ण संच जळून खाक, इंटरनेट सेवांनाही फटका
Parbhani News
Parbhani News : ३३ केव्ही सबस्टेशनला भीषण आग; परभणीचा २५ टक्के वीजपुरवठा ठप्पfile photo
Published on
Updated on

Massive fire at 33 kV substation; 25% of Parbhani's power supply disrupted

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा विद्युत केंद्रातील दर्गा रोडला वीजपुरवठा करणाऱ्या 33 केव्ही सबस्टेशनमधील रोहित्राला शुक्रवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने 33 केव्हीचा संपूर्ण संच आगीत जळून खाक झाला. या घटनेमुळे दर्गा रोडसह लगतचा परिसर आणि शहरातील जवळपास 25 टक्के भागाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित राहीला.

Parbhani News
Municipal officers absent in Purna: पूर्णा पालिकेचा कारभार रामभरोसे? CEOसह महत्त्वाचे अधिकारी नियमित गैरहजर असल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप

शुक्रवारी सकाळी जिल्हा विद्युत केंद्रातील 33 केव्ही सबस्टेशन परिसरात रोहित्राला अचानक आग लागली. आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसून येताच सबस्टेशन परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महावितरण अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच परभणी अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. वीजपुरवठा खंडित करून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. आगीचा धोका अन्य यंत्रणांपर्यंत पोहोचू नये यासाठी महावितरणच्या पथकाने आवश्यक खबरदारी घेतली. अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते.

Parbhani News
Parbhani News: जलसंधारण दिनीच कार्यालयात राडा ; विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या आगीचा थेट परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर झाला. दर्गा रोडसह लगतच्या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाला व शहरातील जवळपास 25 टक्के भागाला त्याचा फटका बसला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक, दुकानदार, व्यावसायिक आस्थापना, कार्यालये आणि विविध सेवांचे कामकाज विस्कळीत झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम संबंधित भागातील काही कंपन्यांच्या इंटरनेट सेवांवरही झाला. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने ऑनलाइन व्यवहार, कार्यालयीन कामकाज तसेच इंटरनेटवर अवलंबून असलेल्या विविध सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे वीजपुरवठ्यासह इंटरनेट सेवाही ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

सुदैवाने जीवितहानी नाही

भीषण आगीत 33 केव्हीचा संपूर्ण संच जळून खाक झाला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सबस्टेशन परिसरातील कर्मचाऱ्यांनी वेळीच दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला. आगीची तीव्रता पाहता नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती. आगीमुळे बाधित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत होते. जळालेल्या यंत्रणेची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला जात होता. पर्यायी व्यवस्थेतून शक्य त्या भागात वीजपुरवठा सुरू करण्याबरोबरच खराब झालेली यंत्रणा दुरुस्त अथवा बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news