Livestock killed by lightning
lightning strike : आहेरवाडी शिवारात वीज पडून जनावरे दगावली; तर काही होरपळून गंभीर जखमी झाली File Photo

lightning strike : आहेरवाडी शिवारात वीज पडून जनावरे दगावली; तर काही होरपळून गंभीर जखमी झाली

अखाडा जळून संसारोपयोगी साहित्य व खत जळून खाक; एकूण ५ लाखाचे आर्थिक नुकसान
Published on

Livestock killed by lightning in Aherwadi Shivara

पूर्णा : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतशिवारात ता.६ मे रोजी रात्री सोसाट्याचा वादळीवारा सुटला होता. यातच रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक शेतकरी दिगंबर नामदेव मोरे यांच्या गट क्रमांक ३०३ मधील शेत आखाड्यावर वीज पडली. या दुर्घटनेत गोठ्यात बांधलेल्या जनावरांपैकी दोन गायी, तीन वासरे वीज पडून जागीच दगावली तर अन्य पाच सहा गायी वासरे होरपळून गंभीर जखमी झाली.

Livestock killed by lightning
पंतप्रधान मोदी पाकिस्तानवरील भारताच्या हवाई हल्ल्यावर सतत लक्ष ठेवून होते, डोवाल देत हाेते प्रत्येक क्षणाचे अपडेट, एअर स्‍ट्राईकवेळी नेमकं काय घडलं?

त्यातच विजेमुळे अखाड्यालगत रचून ठेवलेल्या कडब्याने पेट घेतला. अखाड्यावरील धान्य, कपडे व ईतर संसारोपयोगी साहित्य व काही गोण्या रासायनिक खत जळून त्याची होळी झाली. या घटनेत शेतकरी दिगंबर मोरे यांचे सुमारे ५ लाख रुपये आर्थिक नुकसान झाल्याची माहिती छगनराव मोरे यांनी दिली.

जखमी जनावरांवर पशूधन विकास अधिकारी डॉ. कचरे, डॉ दुधारे मॅडम व त्यांची पशूधन आरोग्य टिम उपचार करीत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोउनि अमर चाऊस, जमादार दुधमल, तलाठी डोनगडे, भगवान खंदारे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Livestock killed by lightning
Operation Sindoor Live: 'ऑपरेशन सिंदूर' का आणि कसे राबविले, लष्कराने केली भूमिका स्पष्ट

सदर घटनेमुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील तीन दिवसांपासून पूर्णा तालूका परिसरात सायंकाळी व रात्री उशिरा अचानक वादळीवारे सुटत आहे. यात, सोसाट्याच्या वादळीवा-यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहरीवरील कृषी पंपाचे सोलार पॅनल उखडून जमीनदोस्त झाली आहेत.

दरम्‍यान अंबा, लिंबोनी फळांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच ब-याच भागात मोठी झाडे उन्मळून पडली. कडबे उडून गेली. घरावरील टिनपत्रे उडून जात लांब जाऊन पडली. शेवगा शेंगा झाडे उपटून पडली. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news