MSRTC News | एसटी प्रवासात ज्येष्ठ, दिव्यांगांना स्मार्ट कार्ड शिवाय सवलत सुरू: अफवांवर विश्वास ठेवू नका

आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
MSRTC senior citizen discount Parbhani
MSRTC senior citizen discount Parbhani Pudhari
Published on
Updated on

MSRTC senior citizen discount Parbhani

जिंतूर : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना स्मार्ट कार्ड नसल्यास एसटी प्रवास सवलत मिळणार नाही, अशी पसरलेली माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट करत आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

आनंद चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत ६५ व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जात आहे. राज्यभर सध्या स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू असली, तरी कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही, अशी समजूत चुकीची आहे.

MSRTC senior citizen discount Parbhani
Parbhani News |४८१ कोटी रुपयांची अपेक्षा, मिळाले ४५ कोटी

सध्या ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड उपलब्ध नाही, अशा सर्व पात्र ज्येष्ठ व दिव्यांग प्रवाशांना नियमानुसार सवलतीचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सवलत वितरण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहनही आगार व्यवस्थापकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news