

Illegal assets of the then Tehsildar of Sonpeth exposed
परभणी, पुढारी वृत्तसेवा: सोनपेठ येथील तत्कालीन व सध्या ठाणे महापालिका क्षेत्रातील संजय गांधी योजना विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले आशिषकुमार बापुराव बिरादार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. ही कथित बेकायदा संपत्ती त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या ८१.९१ टक्के इतकी अधिकची असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
या प्रकरणात बिरादार यांच्या पत्नी अपर्णा आशिषकुमार बिरादार यांनाही आरोपी करण्यात आले असून, स्वतःच्या नावावर बेकायदा संपत्ती संपादित करून आरोपीस कथित गुन्ह्यात मदत व प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १) रात्री ७.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार बिरादार यांच्याविरुद्ध यापूर्वी एका तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर सोनपेठ परभणी, पुढारी वृत्तसेवा: सोनपेठ येथील तत्कालीन व सध्या ठाणे महापालिका क्षेत्रातील संजय गांधी योजना विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले आशिषकुमार बापुराव बिरादार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. ही कथित बेकायदा संपत्ती त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या ८१.९१ टक्के इतकी अधिकची असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
या प्रकरणात बिरादार यांच्या पत्नी अपर्णा आशिषकुमार बिरादार यांनाही आरोपी करण्यात आले असून, स्वतःच्या नावावर बेकायदा संपत्ती संपादित करून आरोपीस कथित गुन्ह्यात मदत व प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १) रात्री ७.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार बिरादार यांच्याविरुद्ध यापूर्वी एका तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईनंतर सोनपेठ प्रकरणाचा तपास केवळ एका लोकसेवकापुरता मर्यादित न राहता कुटुंबीयांच्या नावावरील मालमत्ता व संबंधित आर्थिक व्यवहारांपर्यंत विस्तारला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी लोकसेवकाच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घरझडतीतून महत्त्वाचे कागदपत्रे, मालमत्तेशी संबंधित पुरावे अथवा आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते का, याकडे तपास यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची चौकशी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी केली. या चौकशीचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक किशोर तरोणे यांनी केले. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलाणी करीत आहेत. ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. आश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
१४ वर्षांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी
३ नोव्हेंबर २००७ ते ३ ऑगस्ट २०२१ या परीक्षण कालावधीतील आरोपी तहसीलदार आशिषकुमार बिरादार यांचे कायदेशीर उत्पन्न, विविध खर्च, स्थावर व जंगम मालमत्ता तसेच इतर आर्थिक व्यवहारांचे परीक्षण करण्यात आले. या चौकशीत आरोपी बिरादार यांनी ज्ञात कायदेशीर उत्पन्नापेक्षा ८७,८४,२८८ रुपयांची अधिकची बेकायदा संपत्ती संपादित केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. ही रक्कम आरोपीच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तब्बल ८१.९१ टक्के अधिकची असल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती देण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कथित बेकायदा संपत्ती आढळून आल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तपास यंत्रणा आरोपींच्या मालमत्तेसह आर्थिक व्यवहारांची अधिक माहिती गोळा करीत आहेत.