परभणी : मानवतला ज्ञानराधा सोसायटीसमोर ठेवीदारांची मोठी गर्दी, ठेवींबाबत अफवांना उधाण

परभणी : मानवतला ज्ञानराधा सोसायटीसमोर ठेवीदारांची मोठी गर्दी, ठेवींबाबत अफवांना उधाण

मानवत, पुढारी वृत्तसेवा : बीड येथील कुटे ग्रुपची ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीवर कारवाई होणार असल्याच्या अफवेने मानवत शहरातील ज्ञानराधा सोसायटीच्या शाखेत आज ( दि. १३) ठेवीदार व खातेदारांनी मोठी गर्दी केली. आपल्या ठेवी परत घेण्यासाठी पहाटेपासूनच तोबा गर्दी केली. बँकेसमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि. १२) बीड येथील कुटे ग्रुपच्या तिरुमला उद्योग समूहाची आयकर विभागाने चौकशी सुरू केली. याचा परिणाम कुटे ग्रुपच्याच ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीवर देखील होऊ शकतो, अशी अफवा बँकेच्या खातेदार व ठेवीदारांमध्ये पसरली. शहरातील भाजी मंडई परिसरात गोलाईत कॉम्प्लेक्समध्ये या सोसायटीची शाखा असून ठेवींवर व्याजदर चांगला असल्याने या शाखेत शहरासह ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी लाखोंच्या ठेवी ठेवलेल्या आहेत.

या ठेवी बुडू नये, यासाठी ठेवी परत घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळपासूनच येथे खातेधारकांनी मोठी गर्दी केल्याने मोठा गोंधळ उडाला. आज गर्दी वाढत गेल्याने सोसायटीसमोर मंडप टाकण्यात आला. पोलीस बंदोबस्तात सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी ठेवी परत घेण्यासाठीचे फॉर्म वाटप केले. ठेवीदारांना ठेवी परत देण्याची प्रक्रिया सुरू केली .

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news