Parbhani Rain : बॅक वॉटरमुळे अतोनात नुकसान, मराठवाड्यावर अतिवृष्‍टीचा कहर

४०० एकर शेती पाण्यात, १५० हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर, ३५ गावांचा संपर्क तुटला
Parbhani Rain
Parbhani Rain : बॅक वॉटरमुळे अतोनात नुकसान, मराठवाड्यावर अतिवृष्‍टीचा कहर File Photo
Published on
Updated on

Heavy rains wreak havoc in Marathwada, causing immense damage due to backwater

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी पार केली. जायकवाडी, माजलगाव व मासोळी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तालुक्यात गोदावरी नदीच्या बॅक वॉटरचा गंभीर फटका बसला, गामुळे सुनेगाव-सायाळा परिसरातील सुमारे ४०० एकर शेती पूर्ण पाण्याखाली गेली असून, १५० हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. धारखेड पुलावरून नदीचे पाणी वाहू लागल्याने ३५ गावांचा संपर्क पूर्ण तुटला आहे, सुनेगाव येथून ५६ कुटुंब, धारासुरमधून ६० कुटुंब, तर गंगाखेड शहरातील बरकत नगरमधील अनेक कुटुंबांना तात्काळ स्थलांतरित करण्यात आले आहे.

Parbhani Rain
Flood Rescue Operation | ममदापूर शिवारात पुरात झाडावर अडकलेल्या २२ वानरांची सुटका

बरकत नगर भागात घरातच पाणी पुसल्याने अनेकांचे संसार उघडधावर आले आहेत. दरम्यान जालना, चीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे जायकवाडी आणि माजलगाव धरणातून गोदावरी पात्रात एकत्रित ४ लाख क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे. मासोळी धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे.

यामुळे गोदावरी नदीने गंगाखेड शहरातूनच ओसंडून वाहत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण केला. शहरात पुराची स्थिती निर्माण झाली असतानाही ८ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नागरिकांच्या रोषाचा विषय ठरत आहे. पुराचे पाणी शहरात घुसलेले असतानाही नगर पालिकेकडून वेळेत उपाययोजना होत नसल्याची टीका होत आहे. पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत.

Parbhani Rain
Parbhani Flood | सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका; पूरस्थिती नियंत्रणात

गंगाखेड तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, तरी सध्या तालुक्यातील स्थिती ही प्रत्यक्षात एक जलप्रलय आहे, असे चित्र निर्माण झाले.

स्थानिक प्रशासन, महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून बचावकार्य सुरू असले, तरी मदत व पुनर्वसनाच्या कामांमध्ये वेग आणि परिणामकारकता दिसत असली तरी शेतक-यांना भरपाई कची मिळणार याकडे लक्ष लागले आहे. पीडित वागरिकांना तात्काळ अन्न, पाणी, औषधे व विवान्याची गरज असून शासनाने तालुक्यासाठी विशेष निधी जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news