

Parbhani Jintur Political News
जिंतूर : माजी आमदार विजयराव भांबळे यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात मुंबईत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, विजय भांबळे हा माझा जुनाच सहकारी आहे. आम्ही विधानसभेत सोबत काम केलेले आहे. तो विकास कामे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतो. पराभवाने खचून न जाता जनतेची कामे करत रहा. पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचवा, असा मोलाचा संदेश दिला.
यावेळी प्रेक्षाताई विजयराव भांबळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे, माजी अध्यक्ष (जि.प.परभणी) विश्वनाथ राठोड साबिया बेगम कपिल फारुकी, बाळासाहेब भांबळे, अजयराव चौधरी, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, अभिनय राऊत, मुरलीधर मते, बाळासाहेब रोडगे, विठ्ठल घोगरे, रामेश्वर जावळे, ह.भ.प. कैलास महाराज देशमुख चारठणकर, पृथ्वीराज भांबळे, अभिजित भांबळे, तसेच तालुकाध्यक्ष सुधाकर रोकडे, माजी तालुकाध्यक्ष शरदराव अंभूरे, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत गाडेकर, गणेशराव ईलग, मधुकर भवाळे, सुभाषराव घोलप, पुरुषोत्तम पावडे, विजय खिस्ते, वसंतराव राठोड, गोरख भालेराव, प्रकाशराव शेवाळे आदींना राष्ट्रवादीत प्रवेश केला.