

Fatal bus-car accident on Parbhani-Gangakhed road
परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी-गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर दैठणा नजीक बस व कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी (दि.२८) घडली.
बस क्रमांक एम एच१४, एम.एच.०९४४ ही हिंगोली आगाराची बस गंगाखेडहून परभणीकडे येत होती तर कार क्रमांक एम एच १२, केएल ८२६६ ही गंगाखेडकडे जात होती.
दैठणा गावानजीक कार बसच्या समोर अचानक आल्याने अपघात झाला. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. सदरील कारमध्ये तीन प्रवासी होते अशी माहिती मिळाली आहे.