Parbhani Crime News
Parbhani Crime News : जाचाला कंटाळून काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाने जीवन संपवलेFile Photo

Parbhani Crime News : जाचाला कंटाळून काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाने जीवन संपवले

मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Published on

Former Congress city president ended his life after being harassed

मानवत, पुढारी वृत्तसेवा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी नगर-सेवक व शिवसेना शिंदे गटाचे नेते श्याम ऊर्फ गणपत माधवराव चव्हाण वय ५४ यांनी गुरुवारी १९ सकाळी साडे अकराच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवल्‍याची घटना घडली असून याप्रकरणी त्यांचा भाऊ बालाजी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून त्यांचे शेत शेजारी असलेल्या एका क्रेशर खडी चालक व त्याच्या मुलाविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Parbhani Crime News
Charthana Accident | चारठाणा येथे पुलावरून स्कार्पिओ घसरून ४ जण जखमी

शिवाजी विठ्ठलराव दहे व अमर शिवाजी दहे असे त्या संशयित आरोपीची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आत्महत्या प्रकरणी बालाजी माधवराव चव्हाण वय ४६ राहणार रचना कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे ४ भावांचे एकत्रित कुटुंब असून ते सर्वजण आई वडिलांसह सोबत राहत असून. श्याम चव्हाण हे सर्व भावात मोठे होते. गुरुवारी ता १९ सकाळी बालाजी चव्हाण हे सकाळी ११ वाजता परभणीला लग्नासाठी गेले होते. साडेअकराच्या सुमारास त्यांना फोन करून बोलून येत आले.

यावेळी घराचे पाठीमागील नवीन पत्राच्या टीन शेडचे गोडाऊनमध्ये लोखंडी अंगाला दोरीच्या साह्याने श्याम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ग्रामीण रुग्णालयात शववीच्छेदन दरम्यान पँटच्या पाठीमागील खिशात चिट्ठी सापडली.

शिवाजी दहे व अमर दहे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवन यात्रा संपत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी सदरील चिठ्ठीच्या आधारे व बालाजी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी दहे व अमर दहे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news