Charthana Accident | चारठाणा येथे पुलावरून स्कार्पिओ घसरून ४ जण जखमी

नांदेड - संभाजीनगर राज्य महामार्गावरील घटना
Charthana  Scorpio  Accident
चौथ्या पुलावरून स्कार्पिओ रस्ता सोडून खाली घसरली. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Scorpio Accident Charthana Bridge 

चारठाणा : नांदेड - संभाजीनगर राज्य महामार्गावरील चारठाणा येथील चौथ्या पुलावरून स्कार्पिओ (28 ए जे 67 86) रस्ता सोडून खाली घसरली. ही घटना आज (दि. १९) दुपारी साडेतीन वाजता घडली. स्कार्पिओ जिंतूरहून सिंदखेड राजाकडे जात होती.

पृथ्वीराज अर्जुन चव्हाण (वय 17, रा. मंठा), गजानन मोहन शिंदे (वय 22, रा. मलकापूर, पांगरा, ता. सिंदखेड), राजा रोशन प्रदीप चव्हाण (वय 19, रा. टोकवाडी, ता. मंठा), सोनू अझहर पठाण (वय 20, रा. सिंदखेडराजा) अशी जखमींची नावे आहेत.

Charthana  Scorpio  Accident
परभणी : पांदण रस्त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. झिंजुर्डे, जमादार आर. एम. कोंढरे, जिलानी शेख, एच. पी. गायकवाड, महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक इरफान इनामदार, सूर्यकांत हाके, मनोहर हाके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तत्काळ जिंतूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. गजानन शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे नांदेड - संभाजीनगर राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. चारठाणा पोलीस व महामार्ग पोलीस यांनी वाहतूक पूर्ववत केली.

Charthana  Scorpio  Accident
Parbhani News : परभणी तालुक्यात २३ हजारांवर शेतकरी आयडीपासून दूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news