हद्दपार आरोपी परतला, पोलिसांनी केली अटक

उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याला एक वर्षाकरिता परभणी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
parbhani crime news
हद्दपार आरोपी परतला, पोलिसांनी केली अटक file photo
Published on
Updated on

Externed Accused Returns; Police Arrest Him

मानवत पुढारी वृत्तसेवा

अनेक गुन्ह्यात कुख्यात आरोपी असलेला व उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा हद्दपारीचे आदेश काढलेले असतांना देखील मानवत शहरात वावरणाऱ्या एकास गुरुवारी ता 23 येथील पोलिसांच्या पथकाने दुपारी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पकडून अटक केली.

parbhani crime news
Jalna News : व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद

रणसिंग कन्हैया सिंग टाक (वय 35) राहणार पाथरी नाका मानवत असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याला एक वर्षाकरिता परभणी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.

हद्दपार केलेला आरोपी शहरात परत वावरत असल्याच्या माहितीवरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्याला पोलिसाच्या पथकाने अटक केली.

parbhani crime news
शिंदे गटाच्या अहिल्यानगर जिल्हाप्रमुखाला बीडमध्ये बेड्या

या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काॅन्स्टेबल नारायण सोळंके तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news