

Even happiness turned fatal for the youth of Vadgaon
परभणी, पुढारी वृत्तसेवा २ सप्टेंबर रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य शासनाने शासन परिपत्रक काढल्याचे वृत्त महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात धडकले. या निर्णयामुळे अति आनंदी झालेल्या तालुक्यातील वडगाव सुक्रे येथील माणिक सुक्रे या युवकाला हृदय विकाराचा झटका येवुन त्याची प्राणज्योत मालवल्याची घटना घडली.
माणिक सुक्रे हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन गावामध्ये ऑनलाईन सेवा केंद्र चालवायचा. आई वडिलांचे छत्र हरपलेले त्यात पत्नीची किडनी निकामी झालेली अशा बिकट परिस्थितीतही माणिक जगण्यासाठीचा संघर्ष करत होता.
माणिक सुक्रे मुंबई येथील घडामोडीवर बारकाईने नजर ठेवुन होता. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी शासनाने शासन परिपत्रक काढल्याचे समजताच स्पर्धा परीक्षेची तयारी करु पाहणाऱ्या माणिक सुक्रेला अत्यंत आनंद झाला. हर्षोल्हासात असतांनाच त्याची प्राणज्योत मालवली. एका होतकरु युवकासाठी आनंदही जीवघेणाच ठरल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे. मित्तभाषी असल्यामुळे त्याचे सगळ्यांशीच सलोख्याचे संबंध होते.