खासदारांच्या मागणीनंतरही रेल्वे हडपसर स्टेशनवरच

प्रवाशांचा संताप; खडकी किंवा पिंपरी-चिंचवडपर्यंत विस्तार करा
parbhani news
खासदारांच्या मागणीनंतरही रेल्वे हडपसर स्टेशनवरचfile photo
Published on
Updated on

Despite demands from MPs, the railway remains at Hadapsar Station

सेलू, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा व लातूर विभागातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या हडपसरला टर्मिनेट केल्या जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्शवभूमीवर ही व्यवस्था तात्पुरती असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. मराठवाडयातील खासदारांनी मागणी करूनही यात कोणताही बदल झालेला दिसत नाही.

parbhani news
MP Ashok Chavan : मराठवाडा, विदर्भ अन्‌‍ पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी मिसिंग रेल्वे लिंक पूर्ण करा!

हडपसर येथे उतरल्यानंतर प्रवाशांना पुणे शहरात पोहचण्यासाठी अतिरिक्त १५ ते २५ किमी अंतर कापावे लागत असून दररोज १०० ते ३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च व १ ते २ तासांचा वेळ खर्च होतो. कामगार, विद्यार्थी, रुग्ण व महिला प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, उत्तर भारत व गुजरातहून येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र थेट पुणे स्टेशनपर्यंत नियमित चालवल्या जात आहेत. त्यामुळे वेगळे नियम, वेगळे न्याय अशी परिस्थिती निर्माण झाली असून मराठवाडा व लातूर प्रवाशांत असंतोष निर्माण झाला.

विशेष म्हणजे, मराठवाड्यातील खासदारांनी यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे किमान पुणे स्टेशनपर्यंत गाड्या चालविण्याची मागणी अधिकृतरित्या मांडली. मात्र, याकडे अद्याप ठोस लक्ष न दिल्याने नागरिकांत नाराजी आहे. रेल्वे तज्ज्ञांच्या मते, खडकी स्टेशन किंवा पिंपरी चिंचवडपर्यंत गाड्या वाढविणे हे व्यवहार्य व समाधान ठरू शकते. योग्य नियोजन, स्वतंत्र वेळापत्रक आणि धोरण राबविल्यास गाड्या सहज पुढे वाढविता येऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ तांत्रिक नसून प्राधान्यक्रमाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

parbhani news
Bajrang Sonawane : मराठवाड्यातील रेल्वे सुविधांत वाढ करा

या आहेत मागण्या...

मराठवाडा व लातूरकडील सर्व गाड्या तात्काळ पुणे स्टेशन तसेच पुढे खडकी किंवा पिंपरी-चिंचवडपर्यंत वाढवाव्या, सर्व गाड्यांसाठी समान व पारदर्शक धोरण लागू करावे पुणे-खडकी-पिंपरी मार्गावर मराठवाडा गाड्यांसाठी स्वतंत्र स्लॉट निश्चत करावेत, पिंपरी-चिंचवड येथे अतिरिक्त प्लॅटफॉर्म व देखभाल सुविधा विकसित कराव्यात, तात्प-रत्या उपाययोजनेसह दीर्घकालीन आराखडा जाहीर करावा अशा नागरीकांच्या मागण्या आहेत. यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सह्या मोहीम सुरू केली असून, १००० पेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह रेल्वे प्रशासन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालयाला निवेदन देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news