

Manwath Taluka voter list
मानवत : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी मानवत तालुक्यातील प्रारूप मतदार यादी तीन डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून दावे व हरकती सादर करण्याचा अंतिम मुदत 18 डिसेंबरपर्यंत आहे. यादी पाहण्यासाठी तहसील कार्यालय व तहसील अंतर्गत सहा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रारूप प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये एकूण १४ ०३ पदवीधर मतदार असून यासाठी तालुक्यातील एकूण सहा बीएलओ नेमण्यात आले आहेत. बीएलओ म्हणून पाच मंडळाधिकारी व एक तलाठी यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीवर दावे किंवा हरकती असल्यास संबंधित मंडळ स्तरीय बीएलओ किंवा तहसील कार्यालय मानवत येथे दिनांक 18 डिसेंबर पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
नावामध्ये किंवा इतर माहिती मध्ये त्रुटी असल्यास नमुना क्रमांक आठ नाव कमी करायचे असल्यास नमुना क्रमांक सात भरून देता येईल, दावे हरकती निकाली काढण्याचा दिनांक 5 जानेवारी 2026 असा असून अंतिम पदवीधर मतदार यादी 12 जानेवारी 2026 असे राहणार आहे, अशी माहिती पद निर्देशित अधिकारी तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड व नायब तहसीलदार संजय खिल्लारे यांनी केलेले आहे.