Good Touch - Bad Touch : बालकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा-महाविद्यालयांत अभियान

गुड टच - बॅड टच, स्वसंरक्षणाचे धडे; बालहक्क संरक्षणासाठी दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांत जनजागृती
Good Touch - Bad Touch
Good Touch - Bad Touch : बालकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा-महाविद्यालयांत अभियानfile photo
Published on: 
Updated on: 

Campaign in schools and colleges for the safety of children

परभणी, पुढारी वृत्तसेवा : बालकांवरील अत्याचार, लैंगिक अन्यायाच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता विद्यार्थ्यांनाच त्यांच्या सुरक्षिततेविषयी जागरूक करण्यावर भर दिला जात आहे. या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांत सुरक्षित बचपण अभियान राबविण्यात येत आहे.

Good Touch - Bad Touch
Youth killed over verbal abuse controversy | शिवीगाळ केल्याच्या रागातून युवकाचा खून

याअंतर्गत आतापर्यंत ६५ हून अधिक शाळा, महाविद्यालये व वसतिगृहांत जनजागृतीपर कार्यक्रम घेतले. गुड टच-बॅड टचमधील फरक, पोक्सो कायद्याचे संरक्षण, स्वसंरक्षणाचे महत्त्व व संकट वेळी मदत मिळविण्याचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत आहे. शोषण, बालहक्कांचे उल्लंघन व पण महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या निर्देशानुसार राज्यभर अभियानाची अंमलबजावणी होत आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष आर. एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनात परभणी व हिंगोली जिल्ह्यांत विविध शैक्षणिक संस्थांत उपक्रम राबविण्यात येत आहे. बालकांना केवळ शिक्षणच नव्हे, तर सुरक्षित वातावरण, त्यांच्या हक्कांची जाणीव होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बालवयातच मुला-मुलींना स्वतःच्या शरीराविषयी सजगता, वैयक्तिक सुरक्षितता व कायदेशीर अधिकारांची माहिती मिळावी, हा प्रमुख हेतू आहे.

बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुड टच-बॅड टच हा विषय अभियानात प्राधान्याने हाताळण्यात येत आहे. योग्य आणि अयोग्य स्पर्शातील फरक विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीकडून अनुचित स्पर्श किंवा गैरवर्तन झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. भीतीपोटी ही बाब लपवून न ठेवता तत्काळ पालक, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तीला सांगावी, असे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

Good Touch - Bad Touch
ST Corporation : एसटी कामगार आक्रमक; आगारांत महाद्वार सभा

संशयास्पद परिस्थिती ओळखणे, प्रसंगावधान राखणे व अडचणीच्या वेळी मदत मागण्याचे धाडस दाखविणे, यावरही विशेष भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना केवळ कायद्याची माहिती देण्यापुरते हे अभियान मर्यादित नसून, प्रत्यक्ष जीवनात संकटाचा सामना करण्याची मानसिक तयारी निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे. बालकांचे संरक्षण ही केवळ शासन, पोलीस किंवा न्यायव्यवस्थेची जबाबदारी नाही.

कुटुंब, शाळा, शिक्षक, पालक व समाजातील प्रत्येक घटकाने ती स्वीकारणे आवश्यक आहे. मुलांना आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगता येतील, असे विश्वासाचे वातावरण निर्माण करणे काळाची गरज आहे. अभियानातून विद्यार्थ्यांत जागरूकता निर्माण करण्यासह पालक, शिक्षक व समाजालाही बालसंरक्षण जबाबदारीची जाणीव करून दिली जात आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) भूषण काळे यांनी केले.

पोक्सो कायद्याचे कवच : बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अर्थात पोक्सो कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत देण्यात येत आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार घटनांना प्रतिबंधासाठी कायद्यातील तरतुदी, पीडित बालकांना मिळणारे संरक्षण, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया व कायदेशीर मदतीसाठी उपलब्ध यंत्रणेबाबत मार्गदर्शन होत आहे. अत्याचाराची घटना घडल्यानंतर बदनामीच्या भीतीने किंवा दबावामुळे गप्प राहणे थोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती विश्वासातील व्यक्तीला सांगणे व संबंधित यंत्रणांची मदत घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.