Parbhani ZP | परभणी जिल्हा परिषदेवर पहिल्यादांच भाजपची सत्ता: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दखल

जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई विजय वाकळे यांचा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
BJP Power Parbhani ZP
जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई विजय वाकळे यांचा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला Pudhari
Published on
Updated on

Parbhani ZP BJP

परभणी : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई विजय वाकळे यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथे हा गौरव सोहळा पार पडला.

परभणी जिल्ह्यात प्रथमच भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जिल्हा परिषदेसह नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्येही उल्लेखनीय यश मिळवले. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे २४ सदस्य विजयी झाले असून महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे.

BJP Power Parbhani ZP
Parbhani News | संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय समितीच्या नियुक्त्यांना स्थगिती

या निवडणुकीनंतर लताताई विजय वाकळे यांची जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे श्रीकांत भोसले विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रभावी नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. विशेषतः पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांवर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

BJP Power Parbhani ZP
Parbhani Accident | दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्‍नात स्विफ्ट कार- मिनी ट्रव्हल्सची भीषण धडक, तीन ठार: आठ जखमी

या कार्यक्रमाला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, गटनेते दिलीपराव देशमुख, सुनील भोंबे पाटील, सुमेध सूर्यवंशी आणि संजय वाकळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news