

मानवत, पुढारी वृत्तसेवा : परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपलाच सुटणार असून मोठ्या ताकदीने लढवून विजय मिळविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन भाजप नेते व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मानवत येथे केले.
शहरातील दिव्यानंद उद्यान येथे झालेल्या परभणी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या मानवत मंडळाची आढावा बैठकित ते बोलत होते.
या बैठकीस माजी आ. मोहन फड, आमदार मेघना बोर्डीकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रबदडे, भाजप जिल्हा सरचिटणीस विलास बाबर, संतोष चौधरी, पाथरी विस्तारक देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शिवराज नाईक, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक, ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रा. अनंत गोलाईत, भाजप जिल्हा सरचिटणीस भागवत बाजगीर, अर्जुन बोरुळ, मंगला मुदगलकर, प्रा. पी. डी. पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदकिशोर बैलोरे, परभणी तालुका अध्यक्ष देवा शिंदे, तालुका सरचिटणीस आकाश लोहट, मानवत तालुका अध्यक्ष विकास मगर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महादेव कोल्हे आदीसह भारतीय जनता पक्षाचे शक्ती केंद्र बूथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा