

Babhalgaon's God's Horse leaves for Pandharpur Wari
पाधरी, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील बाभळगाव येथील रणेर कुटुंबीयांची पंढरपूर आषाढी वारीतील 'देवाचा अश्व' नेण्याची परंपरा तब्बल १०० वर्षांपासून अखंडित सुरू आहे. ही परंपरा संत तुकाराम महार-ाजांच्या पालखी सोहळ्याशी निगडित असून या अश्वाला वारीत विशेष मान दिला जातो. वारीत सहभागी होण्यासाठी बुधवारी (दि.४) या अश्वाचे बाभळगावातून विधिवत पूजा झाल्यानंतर मिरवणूक काढून प्रस्थान झाले.
पाथरी तालुक्यातील विनायकराव नारायणराव रणेर या घराण्याने १०० वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासली आहेप्रथेनुसार बाभळगावाह्न हा अश्व प्रथम थेट पंढरपूरला नेण्यात येतो. तेथे त्याची विधीपूर्वक पाद्यपूजा केली जाते. त्यानंतर हा अश्व देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे पायी प्रवास करतो.
वारी दरम्यान तो उभ्या आणि आडव्या रिंगणात सहभागी होतो आणि वारकऱ्यांच्या श्रध्देचा केंद्रबिंदू ठरतो. बाभळगाव येथून पूर्वी हा अश्व पंढरपूरपर्यंत पायी नेण्यात येत होता, मात्र आता बाभळगाव येथून वाहनाने पंढरपूरपर्यंत नेण्यात येतो व तेथून पुढे पायी दिंडीत सहभागी होतो. रणेर कुटुंबीय या अश्वाची वर्षभर मुलासारखी काळजी घेतात. तो कोणत्याही इतर कामासाठी वापरला जात नाही.
साधारणतः ८ ते ९ वर्षांनी हा अश्व बदलून नवीन अश्व स्वः खचनि खरेदी केला जातो, तर जुना अश्व मानाने निवृत्त केला जातो. ही परंपरा वारकरी संप्रदायाच्या श्रध्देचे आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. रणेर कुटुंबीयांनी ती तीन पिढ्यांपासून निष्ठेने जपली असून आजतागायत ती भावपूर्ण श्रध्देने सुरू आहे. बुधवारी (दि.४) या अश्वाचे बाभळगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले, गावात विधिवत पूजा करण्यात आली व टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व नंतर या अश्वाचे प्रस्थान नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.