परभणी : डॉग तेजाकडून सेलू स्थानकासह रेल्वे गाड्यांची तपासणी | पुढारी

परभणी : डॉग तेजाकडून सेलू स्थानकासह रेल्वे गाड्यांची तपासणी

सेलू ,पुढारी वृत्तसेवा : नांदेड रेल्वे विभागातील ट्रॅकर डॉग तेजा याने आज (दि.२९) सेलू रेल्वे स्थानकासह, रेल्वे गाड्यांची तपासणी केली  यावेळी रेल्वेचे हेड कॉन्स्टेबल मारुती नवाडे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय सुरवाडे, हेड कॉन्स्टेबल बी.अंजनाप्पा हे स्थानकावर उपस्थित होते.

नांदेड विभागातील औरंगाबाद येथील सिंबा डॉग व नांदेड येथील तेजा डॉग हे दोन्ही प्रशिक्षित डॉग रेल्वे स्थानकावरील व रेल्वे गाड्यातील अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी सतत कार्यरत असतात. आरपीएफ हेडकॉन्स्टेबल मारुती नवाडे यांच्यासोबत आज (शुक्रवारी ) डॉग तेजा सेलू रेल्वे स्थानक परिसरात फिरताना दिसल्यानंतर प्रवाशांच्या मनात वेगळे आकर्षण निर्माण झाले होते. त्याने नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस, नांदेड- मुंबई तपोवन एक्सप्रेस, व अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस या तीन गाड्यांची तपासणी केली . तपासणीनंतर कुठेही गैरवस्तू व स्फोटके आढळून आली नाहीत, यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला.

हेही वाचा :

Back to top button