परभणी: ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील सावरगाव येथील ४ जण निर्दोष | पुढारी

परभणी: ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील सावरगाव येथील ४ जण निर्दोष

मानवत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सावरगाव येथील ४ जणांवर क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या ४ जणांची सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (दि.१५) निर्दोष मुक्तता केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३ सप्टेंबर २०२१ रोजी सावरगाव (ता.मानवत) येथील फिर्यादी छाया कचरुबा वाघमारे यांनी उत्तम आश्रुबा टरफले व त्यांच्या तीन मुलांविरुद्ध घरासमोरील शेळीचे पिल्ले का हुसकावतोस म्हणून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन मानवत येथे कलम २९४ भादवी व ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा अन्वये फिर्याद दिली होती.

त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास अतिरिक्त एसपी अविनाश कुमार यांनी करून दोषारोपपत्र परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. सदर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय परभणी यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले त्यानंतर सुनावणी झाली. त्यानंतर सबळ पुराव्याअभावी उत्तम अश्रोबा टरफले, संदीप उत्तम टरपले, योगेश उत्तम टरफले व अरुण उत्तम टरफले यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात संशयित आरोपीतर्फे मानवत येथील अॅड. व्ही. आर. चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. हरिदास जाधव यांनी सहकार्य केले.

हेही वाचा 

Back to top button