Parabhani news: आपला जिल्हा पक्षी – प्राणी असावा! – डॉ. रामेश्वर नाईक | पुढारी

Parabhani news: आपला जिल्हा पक्षी - प्राणी असावा! - डॉ. रामेश्वर नाईक

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील अनेक भागातील तलावांमध्ये हिवाळी स्थलांतरित पाणपक्ष्यांचे व इतर पक्ष्यांचे वास्तव्य आढळून येते. पक्ष्यांच्या अधिवासाचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास होऊन त्याचे जाणीवपूर्वक संवर्धन करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यासोबत परभणी जिल्हाला आपला जिल्हा ‘पक्षी – प्राणी’ असावा असे मत डॉ. रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केले. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने पक्षी ओळख व निरीक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

वारकरी सांप्रदायाने प्रत्येक जीवाची काळजी घ्यायला शिकवली असल्याने जुन्याकाळी लोक मंदिर किंवा माळवदाच्या कड्याना ज्वारीची कणस बांधून ठेवत. आपल्या सभोवताल असंख्य जीवजंतू व पक्षी वावरत असतात परंतु आपण डोळसपणे त्यांच्याकडे पाहत नसल्याने आपल्याला आजही पक्ष्यांचे महत्व लक्षात येत नाही. पक्ष्यांच्या अस्तित्वाने आजूबाजूच्या पिकांवर सकारात्मक परिणाम होऊन पिककिडीवर नियंत्रण ठेवण्यात पक्ष्यांची अत्यंत भूमिका महत्वाची असते.

आपल्या सभोवतालची ही समृध्द जैवविविधता, पक्ष्यांचे अस्तित्व, विविध वनस्पती यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी अशा कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ प्रताप पाटील, डॉ जगदीश नाईक, डॉ रणजित लाड, प्रा.डॉ.अशोक वैद्य, नागेश वाईकर, प्रा. गंगाराम कऱ्हाळे, नितीन लोहट, सुमित दुट्टे , दत्ता बनसोडे, समीर पावडे, ॲड. मनोज सारडा, अशोक लाड, निलावार आदी उपस्थित होते. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ दुर्गादास कान्हडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ढाकणे, माणिक पुरी, अनिल उरटवाड, बाळू बुधवंत, हरिभाऊ आदाबे आदींनी प्रयत्न केले. यावेळी अनेक बालगोपाळानी सुद्धा पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला.

हे पक्षी आढळून आले

रंगीत करकोचा, शेकाट्या, जांभळा बगळा, राखी बगळा, पाणकावळा, पाणघार, वारकरी, सामान्य लालसरी, मोठी लालसरी, अग्निपंख , कवडी मैना, खाटीक, कापसी घार,मोर शराटी, हळदी कुंकू बदक, लाल डोक्याचा ससाणा, सामान्य बटलावा, जांभळी पाणकोंबडी, टिटवी, नदी सूरय, कल्लेदार सूरय पारवा, पोपट, सामान्य खंड्या, वेडा राघु, हुदहुद्या, माळ भिंगरी, पांढरा धोबी, पांढऱ्या भूवईचा धोबी,पिवळा धोबी, करडा धोबी, धान तिरचिमणी, बुलबुल, चिराक, दयाळ, सामान्य सातभाई, शिंपी, जांभळा शिंजीर, साळुंकी, कोतवाल, पाणघार इत्यादी पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या. निवळीच्या तलावावर आज पर्यंत १४९ पक्ष्यांच्या नोंदी अनिल उरटवाड यांनी केल्या आहेत.

Back to top button