परभणी – मराठा आरक्षणासाठी युवकांचे राजीनामा सत्र | पुढारी

परभणी - मराठा आरक्षणासाठी युवकांचे राजीनामा सत्र

गंगाखेड (परभणी) – मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला अधिक तीव्र करण्यासाठी विविध पक्षात काम करणाऱ्या युवकांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि पदांचे राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे. माजी जिल्हा परिषद श्रीकांत भोसले यांनी मंगळवारी (दि.२४) रोजी राष्ट्रवादीच्या गंगाखेड विधानसभा अध्यक्षपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

मराठा समाज बांधवांची शहरातील द्वारका मंगल कार्यालयात बैठक पार पडली. मराठा कृती समितीचे गंगाखेड तालुका अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, संचालक उद्धवराव सातपुते, ॲड. आर. आर. वडकीले, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, निवृत्त सुभेदार विश्वनाथ सातपुते, गंगाधर पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भोसले यांच्यासह मराठा समाज बांधव माजी आमदार सीताराम घनदाट यांच्या संपर्क कार्यालयावर पोहोचले. श्रीकांत भोसले यांनी राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष पदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट यांच्याकडे सोपवला. तसेच राष्ट्रवादीच्या युवक जिल्हा संघटक पदाचा अमोल काळे यांनी तर तालुका सचिव पदाचा राजीनामा दिला. तसेच भाजपचे कार्यकर्ते अजय भिसे यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 

Back to top button