

396th birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj
परभणी, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात हजारी शिवभक्तांनी भेट देत आपल्या लाडक्या राजाला राजे... तुम्हासनी मानाचा मुजरा.. अशी साद घातली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून उत्साह व उल्हासाचे वातावरण दिसले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवजयंतीच्या पार्श्वचूमीलाच आकर्षक अशी विद्युत से पणाई करण्यात आली होती. १९ फेबुवारीचा दिवस उजाडताच हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात धाव घेत आपल्या लाडक्या राजाला अभिवादन केले. सकाळपासून दिवसभर अभिवादनासाठी शिवभक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पुस्तकांच्या स्टॉलसह जरि टोप, भगव्या पताका, भगये रुमाल, शिवप्रतिमा विक्रीच्या दुकानदारांनी स्टॉल लाबले होते. बच्चे कंपनी डोक्यावर जरि टोप लावून बाल शिवबाच्या रुपात मिरवताना दिसून आली. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, खा, संजय जाधव, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, आ. डॉ. राहुल पाटील, महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश घुमरे व विविध पक्ष, सामाजिक संघटना, वारकरी सांप्रदायातील मंडळीनी शिवाजी पुतळा परिसरात आपल्या लाडक्या राजाला अभिवादन केले.
गुरुवारी शहरातील विविध भागातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत दुचाकीची रॅली काढ़त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. पुतळा परिसरात मल्लखांब व अन्य कसरती खेळांचे चित्त बरारक प्रात्यक्षिके शिवभक्तांचे लक्ष वेधणारी ठरली.
गुरुवारी दिवसभर विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटनांच्या वतीने जागोजागी फराळासह खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवार बाजारातून भव्य मिरवणूक काहण्यात आली. मिरवणुकीत वारकरी सांप्रदायातील भाविक भक्तांसह हलगी पथक, ढोल-ताशा पथक, शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले घोडेस्वार मावळ्यांसह आकर्षक जसा रथ लक्षवेधी ठरला. एकंदरीत शहरात शिवजयंतीच्या निमिताने भगवेमय वातावरण पहायला मिळाले.
शहर मनपाच्या वतीने शिवाजी चौकात शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठो मंच उभारण्यात आला होता. पुतळा परिसरातही मनपाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीतच शिव जयंतीच्या निमित्ताने राजे... तुम्हासनी मानाचा मुजरा... अशीच भावना शिवभक्तांतून दिसून